Subscribe Us

येरमाळा चैत्री यात्रेस 6 एप्रिल पासून सुरुवात.


येरमाळा / तेरणेचा छावा:- येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा आठवड्यावर आली असून यात्रेची कार्यक्रम पत्रिका देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे.श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा ता.६ ते ११ एप्रिल दरम्यान पाच दिवस भरणार असुन चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी ता.७ रोजी होणार आहे.
     येरमाळा येथील प्रसिद्ध देवस्थान,तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणुन लौकिक असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा ता.६ ते ११ दरम्यान होत असून यात्रेची कार्यक्रम पत्रिका प्रकाशित झाली असुन देवीची चैत्र पोर्णिमा म्हणजे राज्यातील पंढरपूरच्या आषाढी यात्रेनंतर दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून राज्यात परिचित आहे.चैत्र पोर्णिमा यात्रेचे कार्यक्रम अशा प्रकारे होणार आहेत.
       ता.६ गुरुवार चैत्र पौर्णिमेला देवीच्या चैत्र पोर्णिमा महापूजा छबिना कार्यक्रम देवीच्या मुख्य मंदिरात रात्री.१० वा.होणार आहे.ता.७ शुक्रवार रोजी यात्रेच्या मुख्य चुना वेचण्याचा दिवशी स.८ वा.देवीच्या पालखीचे आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम देवीच्या पालखीचे आगमन स.१० वा चुन्याच्या रानात आल्या नंतर होणार आहे.११ वा.पालखी आमराई मंदिरात दाखल होईल.पालखी आमराई मंदिरात पाच दिवस असते.
ता.८ शनीवार रोजी पशुप्रदर्शन स.११ वा.होणार आहे.ता ९ रवीवारी रोजी दु ४ वा.कुस्त्यांची दंगल तर रात्री ९ वा.आराधी मंडळांच्या आराधी गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
ता.१० सोमवार रोजी रात्री ९ वा.विठ्ठलरुक्मिणी मंदिरातून शोभेच्या दारूच्या अतिष बाजीची मिरवणूक निघुन आमराई मंदिर परिसारत शोभेच्या दारूच्या अतिषबाजीचा कार्यक्रम होणार आहे.ता.११ मंगळवार रोजी दु. ४ वा. देवीच्या पालखीची पंचोपचार महापूजेनंतर घुगरी महाप्रसादाचे वाटप झाल्या नंतर पालखीचे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे वाजत गाजत प्रस्थान होइल.

श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून दोन यात्रा भरतात ऐक नारळी पोर्णिमेला आणि दुसरी चैत्र पोर्णिमेला भरणारी यात्रा म्हणजे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा मानली जाते.
या यात्रेच्या चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून तर बाहेर राज्यातूनही लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात.चुना वेचण्याचा कार्यक्रम हा मुख्य कार्यक्रम म्हणुन पूर्वापार चालत आलेली प्रथा मानली जाते.या दिवशी भाविकांची तोबा गर्दी होते.

Post a Comment

0 Comments