Subscribe Us

आज येडेश्वरी यात्रा आढावा बैठक,वरिष्ठांना सूचना नाहीत,येडेश्वरी यात्रा राम भरोसे,तुळजापूर देवस्थानच्या तुलनेत वरिष्ठांचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप.

येरमाळा / तेरणेचा छावा :-येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा ता.६ ते ११ एप्रिल दरम्यान होत असुन तहसील दारांच्या नियोजन बैठकी नंतर उपविभागीय अधिकारी यांनी मंदिरावर (ता.२९) आढावा बैठक बोलावली आहे.गेल्या बैठकीचे आदेश काढून कर्मचारी संपामुळे तहसीलदार स्वतः कारवाईचे आदेश देऊनही गैरहजर राहिले होते.यात्रेच्या तयारीच्या बैठका होतात मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना नसतात ते आढावा बैठकीला हजर नसतात त्यामुळे प्रशासकीय स्तरावर म्हणाव्या तशा उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासनाला अडचणी येतात.यात्रेचे स्वरुप मोठे असूनही जिल्हा अधिकारी,वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून तुळजापूर देवस्थानच्या तुलनेत यात्रेचे स्वरुप मोठे असूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.
येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा म्हणजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाची यात्रा मानली जाते.यात्रेच्या चुना वेचण्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातून दहा लाखाच्या वर भाविक दाखल होतात.
कायदा सुवस्थेच्या अनुषंगाने यात्रा संबंधित प्रशासनाच्या विविध विभागाकडून पूर्व तयारी केली जाते.मात्र यात्रेचे स्वरुप पाहता यात्रेच्या नियोजन बैठकी नंतर आढावा बैठकीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना नसतात वरिष्ठ अधिकारी हजर नसतात त्यामुळे यात्रे संदर्भात उपाय योजनेवर चर्चाच होते.ऐन वेळी मात्र येणाऱ्या प्रसंगाला स्थानिक प्रशासनाला तोंड द्यावे लागते.
यात्रा काळात केल्या जाणाऱ्या उपाय योजनेत जिल्हा प्रशासन,पंचायत समिती, महसूल,वनविभाग,जिल्हा परिषद विभागाचे आरोग्य,पाणीपुरवठा,बांधकाम विभाग,पोलिस प्रशासन,महावितरण वर ताण पडतो.याविभागाचे उपविभागीय अधिकारी यात्रा बैठकींना हजर असतात.त्यामुळे प्रत्यक्ष यात्रा काळात येणाऱ्या अडचणीवर उपाय योजना करण्यात प्रशासन अपयशी ठरते.
यंदाच्या यात्रा काळात मंदिर परिसरातील रस्ता भाविकांच्या सोयीसाठी पोलिस प्रशासन,वनविभागाने तीन महिन्यापासून प्रयत्न करुन मोकळा केला आहे.या रस्त्यावर उभी असलेली विद्युत लाईन काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने पत्र देऊनही स्थानिक शाखा अभियंत्यांनी निधी अभावी महावितरण काम करु शकत नसल्याचे सांगत ग्रामपंचायत नियोजन बैठकीत (ता.१४ मार्च ) हातवर केले.ही विद्युत लाईन यात्रा काळात मोठा अडसर ठरणार आहे.यामुळे यात्रा काळात मंदिर परिसरातील रस्त्यावरील विद्युत लाईन मुळे कांहीं अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय सध्या प्रशासकीय निधीतून मंदिराच्या पायरीवर सनशेड उभारण्याचे काम चालू आहे.पायरीवर दीपमाळे जवळ एक विद्युत लाईन असुन ही लाईन बाजूला करण्याआभावी सनशेडचे रखडले यात्रा आठ दिवसावर आली असुन महवितरणच्या गलथान कारभारामुळे हे काम बंद आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना यात्रा बैठकीला निमंत्रित केले तर ही बाब व यात्रेचे महत्व समजेल.
आजची (ता.२९ )बैठक येडेश्वरी मंदिरावर दू.४ उपविभागीय अधिकारी यांनी बोलावली असुन देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत सह जिल्हा अधिकारी,उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब यांना बैठकीच्या महितिस्तव प्रती दिल्या असल्या तरी पोलिस अधीक्षक,महावितरण अधीक्षक अभियंता यांना पत्र देण्यात आले नाही.त्यामुळे येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा राम भरोसेच पार पडणार असे दिसते.

Post a Comment

0 Comments