Subscribe Us

श्री येडेश्वरी यात्रा तयारी नियोजनात महावितरणची दिरंगाई, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत घेतले फैलावर.

येरमाळा / तेरणेचा छावा:-  
   येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा अवघ्या सात दिवसांवर आली असून यात्रेच्या प्रशासकीय नियोजित बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतील विषयावर आधारित आढावा बैठक बुधवार ( दि. 29 मार्च )रोजी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली येडेश्वरी मंदिरात पार पडली.इतर विभागांच्या तुलनेत यात्रा संदर्भात तयारीत महावितरणकडून दिरंगाई होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी महावितरणला चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी तहसीलदार मनीषा मेणे, सपोनि अतुल पाटील, सरपंच सुजाता देशमुख,उपसरपंच गणेश बारकुल,माजी सरपंच विकास बारकुल,देवस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, समाधान बेदरे संजय आगलावे अमोल पाटील,ग्रामस्थ,पुजारी,उपस्थित होते.
श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रे बाबत १५ दिवसापूर्वी यात्रा नियोजन बैठकीच्या अनुषंगाने यात्रा काळात केल्या जाणाऱ्या तयारी संदर्भात आरोग्य,पाणीपुरवठा,जि.प. बांधकाम,विभागाने तयारीची माहिती दिली.ग्रामपंचायतने शुद्ध पाणी पुरवठा,या बाबत तर मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात,आमराई परिसरात सी.सी.टिव्ही ८५ कॅमेऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय,पोलिस बंदोबस्ताच्या जोडीला खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षक तुकडी नेमाल्याचे केल्याचे सांगितले.पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त कामी कर्मचारी अधिकाऱ्यांची व्यवस्था केली असल्याचे सपोनि अतुल पाटील यांनी सांगितले.
यावेळी चर्चेत यात्रा काळात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महावितरण कंपनीकडून या दरवर्षीच्या तुलनेत कोणतेच सहकार्य होत नसल्याचे सांगत माजी सरपंच विकास बारकुल यांनी यात्रा काळात पाणी पुरवठा,विद्युत पुरवठा दुरुस्त्या कामासाठी निधी नसल्याचे सांगत  महावितरण जबाबदारी घेत नसल्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महिन्यापूर्वी चर्चा करुन जिल्हा शेष निधीतून मदत व्हावी या साठी प्रयत्न करुन त्यांनी सबंधित कार्यालयाशी महावितरणच्या वरिष्ठांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाशी वेळेवर पत्र व्यवहार केला नाही असे सांगितले.या शिवाय गावातून गेलेल्या खामगाव पंढरपूर रस्त्यावर पथदिवे चालू करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.यात्रा काळात आमराई परिसरातील व्यवसायिकांना विद्युत पुरवठा महावितरणनेच करावा.या चर्चे संदर्भात शाखा अभियंता ठोस भूमिका घेत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांनी सर्व विभागाच्या तयाऱ्या पूर्ण झाल्या असुन महत्वाची जबाबदारी महावितरणची असुन त्यांच्या कडून होत असलेल्या दिरंगाई बाबत उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी चांगलेच फैलावर घेऊन वरिष्ठांशी तुम्ही बोला वेळ पडली तर मी बोलते मात्र यात्रेच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्या बाबत हजर अधिकाऱ्यांना सुनावले.त्यामुळे महावितरण आता काय उपाययोजना करते हे पाहणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments