Subscribe Us

नगरपालिकेची पाणीपुरवठ्याची वीज पुन्हा तोडली!,शहरात 3 दिवसापासून पिण्याचे पाणी बंद,नागरिकांची गैरसोय.

पाणीपुरवठ्याच्या वीजबल थकबाकीला कारणीभूत कोण? नागरिकांचा संतप्त सवाल

धाराशिव /तेरणेचा छावा:- धाराशिव नगरपालिका पाणीपुरवठ्याची वीज तोडल्यामुळे गेल्या ३ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील पाणी वितरण पुन्हा बंद पडला आहे.    शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  नगरपालिकेकडून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून वीज वितरण चे पैसे भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही अशी माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे व ही वीज वितरण चे बिल भरण्याची प्रक्रिया कधीपर्यंत होईल हे देखील स्पष्ट सांगण्यात येत नाही. मागील काही दिवसापुर्वी शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी नेत्यांनी आमच्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे 'श्रेय' घेतले होते मात्र आता पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. 
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नागरिकांना दिलासा द्यावा ज्याला पाण्याचे 'श्रेय' घ्यायचा आहे त्यांनी घ्यावे पण आम्हाला पाणी द्यावे असे नागरिक बोलून दाखवत आहेत
       नगरपालिकेकडे महावितरणची पाच कोटींपेक्षाही अधिक थकबाकी आहे. यामध्ये पाणीपुरवठ्याचीही बाकी मोठ्याप्रमाणात आहे. यामुळे महावितरणकडून वीजबील वसूलीसाठी सातत्याने विजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गेल्याच महिन्यात पुरवठा खंडित केल्यानंतर ३० लाख रुपये बील भरण्यात आले होते. आता पुन्हा वीज तोडण्यात आली आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात पाणीच येऊ शकलेले नाही. यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात मोठी गैरसोय सहन करावी लागली. हिंदूंच्या नववर्षाला  सुद्धा नळाला पाणी न आल्यामुळे तसेच;आता मुस्लिम बांधवांचे रमझान महिन्यातील उपवासही सुरू होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शहराचा पाणीपुरवठा महिना पंधरा दिवसाला  खंडित होत आहे. पालिकेत प्रशासक अधिकारी असताना शिवसेना-भाजप राज्यात शिंदे- फडणवीस सरकार असताना नेहमीच पाणीपुरवठा खंडित झाल्याने याचे नागरिकांचे मत परिवर्तन करण्यासाठी विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. तसेच या वीजपुरवठा खंडीत कशासाठी होत आहे याला कोण जबाबदार आहे, नगर पालिकेच्या तिजोरीवर नेमका डल्ला कोणी मारला,प्रशासक काळात अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची नागरिकांतून चर्चा रंगत आहे, यासाठी सध्या समिती तपास करत असून थोड्याच दिवसात ते बाहेरही येईल, परंतू शहरवाशियांना होणाऱ्या मनस्तापास जबाबदार कोण?असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी याकडे लक्ष देऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी तेरणेचा छावा शी बोलताना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments