गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भैरवनाथ किसान कृषी प्रोडूसर कंपनी गौर ता. कळंब येथे बुधवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजता हरभरा हमीभाव केंद्रात हरभरा खरेदी करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राजेंद्र तिबोले.जनार्धन लगडे. गंगाधर ढवळे,नामदेव केसरे ,अजित माळी, प्रभाकर लगडे लहु कोकाटे व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
31 मार्च पर्यंत हरभराऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंदणी करून घेण्याचे आवाहन भैरवनाथ किसान कृषी प्रोडूसर कंपनीकडून करण्यात आले आहे.
0 Comments