येरमाळा/ तेरणेचा छावा:-
प्रा.संतोष तौर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल
उपळाई ता. कळंब येथे कंकाळेश्वर पतसंस्थेत सत्कार करण्यात आला, यावेळी उपळाईचे सरपंच .विठ्ठल मुंढे, वि.का.सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन सखादादा मुंढे, मुख्याध्यापक तथा कंकालेश्वर परीवाराचे प्रमुख सुनिल मुंढे , वणवे सर, सुर्यभान फावडे, बाबासाहेब ओव्हाळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पतसंस्थेचे संचालक व पदाधिकारी व गावकरी उपस्थीत होते.
प्रा.संतोष तौर यांची निवड झाल्यापासून येरमाळा व परिसरातून सत्कारासाठी दररोज कुठे ना कुठे आमंत्रित करण्यात येत आहे.दांडगा जमसंपर्क व मित्रपरिवार असल्याचे यातून दिसून येत आहे.
0 Comments