उपसरपंच पदी विजयश्री नानसाहेब वाघमारे.
दहिफळ/ तेरणेचा छावा:- ग्रामपंचायत बाभळगांव येथे सरपंच सुजाता तुषार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया गुरुवार (दि.5 जानेवारी) रोजी पार पडली. उपसरपंच पदासाठी विजयश्री नानासाहेब वाघमारे व प्रेमनाथ मधुकर वाघमारे यांचे अर्ज प्राप्त झाले. परंतु प्रेमनाथ वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व विजयश्री वाघमारे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे निवडनुक अध्यासी अधिकारी एस एस पाटूळे यांनी घोषीत केले.
नुकत्याच पार पडलेल्या बाभळगांव ग्रामपंचायत निवडनुकीमध्ये श्री मेसाईदेवी युवा ग्रामविकास पॅनलने दनदनीत विजय मिळवला होता, 9 सदस्य असलेल्या या ग्रामपंतायतीत यावेळी सरपंच पदासद पाच महिला सदस्य निवडून आलेल्या असुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या जयंती मौहत्सवादरम्यान सरपंच व उपसरपंच दोन्ही पदावर महिलांची निवड करुन बाभळगांकरांनी एक चांगला आदर्श घालुन दिल्याबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
प्रसंगी माजी सरपंच आसराम वाघमारे नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांना शुभेच्छा देत आपल्या नेतृत्वाखाली बाभळगांव विकासाच्या प्रगतीपथावर निश्चितच एक वेगळी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आसराम वाघमारे,प्रभाकर अंगरखे,भाग्यश्री चौघुले, प्रेमनाथ वाघमारे,सविता वाघमारे,अर्चना कांबळे,नवनाथ वाघमारे,दैवशाला वाघमारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार प्रसंगी पोलीस पाटील एकनाथ बळीराम पाटील, ग्रामसेवक बारकुल यांच्यासह गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 Comments