Subscribe Us

येडशी ग्रामपंचायतमध्ये महिलाराज


     
 भाजपची 2 मते फुटल्यामुळे उपसरपंच पद महाविकास आघाडीकडे.
     येडशी / तेरणेचा छावा:- उस्मानाबाद तालुक्यातील येडशी ग्रामपंचायत च्या  उपसरपंचपदी प्रिया शशांक सस्ते याची बहुमताने निवड करण्यात आली सरपंच  व उपसरपंच महिला झाल्याने येडशी ग्रामपंचायतवर महिलाराज आले. 
        येडशी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सोनिया प्रशांत पवार या अपक्ष निवडणूक आल्या होत्या तर १७ सदस्य महाविकास आघाडी चे ९ ,भाजप ७,अपक्ष १ असे सदस्य निवडून आले होते. महाविकास आघाडी कडुन प्रिया शशांक सस्ते  व डाॅ प्रशांत हरिश्चंद्र पवार याच्यात लढत झाली यात प्रिया शशांक सस्ते यांना ११ तर डॉ प्रशांत पवार  याना ७ मते पडली .यावेळी भाजपची 2 मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रिय सशांक सस्ते यांची उपसरपंचपदी निवड झाली.
        नुतन सरपंच सोनिया पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी टी साळुंखे, ग्रामविकास अधिकारी संजय आडे यांनी निवडणूक चे काम पाहिले. 
       यावेळी माजी सरपंच प्रदीप सस्ते,हेमंत सस्ते,विजयकुमार सस्ते,गोपाळ सस्ते,जयंत भोसले,शशांक सस्ते,अँड धैर्यशील सस्ते,संजय पाटील,अर्जुन शेळके,महेश नलावडे,बाळासाहेब मेटे,दत्तात्रय देशमुख,अशोक पवार,विनोद पवार,अमर पवार,सुनील शेळके व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
         भाजपाचे 2 सदस्य विरोधी तंबूत कसे पोहचले तसेच त्यांना विरोधी गटाकडे  जाण्यासाठी कोणी परावर्त केले याची चर्चा येडशी ग्रामस्थात मोठ्या चवीने चर्चिली जात होती.
    महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments