येरमाळा / तेरणेचा छावा:- पानगाव (ता.कळंब) प्रकरणातील अतिक्रमण धारकांनी पानगाव ग्रामस्थांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरु न पोलिसांनी शुक्रवारी कांहीं ग्रामस्थांना ताब्यात घेतले.पोलिस इतरांचा शोध घेत असताना पुन्हा गावातील महिला,ग्रामस्थांनी एकत्र येत पोलिस कारवाईला विरोध केला.ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडा म्हणून पानगाव येथील चालत आलेल्या महिला,ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला होता.यामुळे कांही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.येरमाळा येथील ग्रामस्थांनी मध्यस्थी करुन सलोखा राखण्यासाठी पानगाव प्रकरणी चोरी प्रकरणाची फिर्याद दाखल करुन गुन्हा नोंद केल्या नंतर तणावाचे वातावरण शांत झाले.
पानगाव ग्रामस्था विरुद्ध दाखल गुन्ह्यातील कांहीं जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर पानगाव ग्रामस्थ महिला यांनी पोलिसांच्या अटक कारवाईला विरोध करत पानगाव येथुन पायी येऊन शेकडो महिला,ग्रामस्थांनी येरमाळा पोलिस ठाण्यात ताब्यात घेतलेल्यांना सोडा नाहीतर आम्हालाही ताब्यात द्या म्हणत ठिय्या घातला होता.रात्री उशिरा ठाण्याचे सपोनि दिनकर गोरे, येरमाळ्याचे माजी सरपंच विकास बारकुल,मदन बारकुल,राजेश निचळे बारकुल,महेश बारकुल इतर ग्रामस्थांनी कायदेशीर बाबीवर चर्चा करुन ठिय्या घातलेल्या महिला, ग्रामस्थांना सलोखा राखण्याचे आवाहन करुन परिस्थिती नियंत्रण आनुन चोरी प्रकरणी पानगाव सरपंचाची फिर्याद दाखल करुन संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
सादर प्रकरणात आम्ही अतिक्रमण केलेली जमीन ही सरकारची आहे तू आमचा विरोध का करतो असे म्हणत गावच्या सरपंचाला मारहान करत पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे जबरीने चोरुन विरोधामध्ये तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी प्रमुख नारायन पवार,दशरथ पवार,दिगंबर पवार,अनिल रामा काळे,अंकुश बप्पा शिंदे,संतोष चंदर शिंदे, साखाराबाई रामा काळे यांच्या विरुध्द पानगाव येथील सरपंच माणिक ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
फिर्यादीत दि.१६ रोजी राञी आपल्या आईसह पत्नी व मूलीसोबत घराच्या कट्यावर बसले असताना खामकरवाडी येथील वरील लोकांनी आम्ही अतिक्रमण केलेली जमीन ही सरकारची आहे तू आमचा विरोधात करतो काय असे कारण काढून सरपंच माणिक ओव्हाळ यांना मारहाण करून पत्नी तिथे आली असता तिचे गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण किंमत अंदाजे ७०,००० रु.जबरीने चोरुन घेऊन जात तू जर आमचे विरोध तक्रार दिली तर मी तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याप्रकरणी सरपंच यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.
वरील प्रमुख सात लोकासह इतर खामकरवाडी येथील कांही लोंकाविरोधामध्ये दरोड्याचा गुंन्हा दाखल करण्यात आला असुन पुधील तपास सपोनि दिनकर गोरे हे करीत आहेत.
0 Comments