Subscribe Us

पोलिसांकडून लक्ष्मी पारधी पीडी येथे पारधी समाजाच्या विकासासाठी मेळाव्याचे आयोजन

येरमाळा / तेरणेचा छावा:-
तेरखेडा (ता.वाशी) लक्ष्मी पारधी पिढी येथे पारधी समाजाच्या विकासासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात पारधी समाजाच्या लोकांना शासकीय योजना मार्गदर्शन व शिक्षणाचे महत्व पटवून शासनाकडून मिळणाऱ्या सवलती या बाबत प्रबोधन करुन त्यांच्या कडून विविध शासकीय योजनांसाठी अर्ज भरुन घेण्यात आले 
     मा.पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन पारधी समजातील लोकांचा विकासासाठी कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी  एम.रमेश(भापोसे), यांचे मार्गदर्शनाखाली तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथील पारधी समजाचे लोकांचे सर्व्हे करुन माहीती गोळा करुन फॉर्म भरुन घेण्यात आले असुन शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी लागणारे कागदपत्राची झेरॉक्स प्रती घेण्यात आल्या असुन त्यांना ज्या योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्याची माहीती घेण्यात आली आहे. त्यावेळी पारधी समाजाचे लोक उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी  एम. रमेश (भापोसे),यांनी त्यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तेथे हजर राहून पारधी समाजाचे लोकांमध्ये जनजागृती केली आहे.
        पारधी समाजाचे लोकांना जनजागृती करून शासनाचे योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री एम.रमेश(भापोसे), तसेच पोलीस ठाणे येरमाळा येथील स.पो.नि. दिनकर गोरे, तसेच श्रीमती नाथीबाई ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबई यांचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक विनायक यांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments