Subscribe Us

जनहित पतसंस्थेच्या दिनदर्शिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येरमाळा येथील जनहित पत संस्थाचे दिनदर्शिकेचे प्रकाशान बुधवार (दि. 21 डिसेंबर) रोजी ह.भ.प. दत्तात्रय बोधले महराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले,            15 वर्षापासून जनहित पतसंस्था दिनदर्शिका चे प्रकाशन करत असून यामुळे पतसंस्थेचे सभासद कर्मचारी व्यापारी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. 
    प्रकाशन सोहळा प्रसंगी ,कारगील योद्धे अनिल (तात्या) पवार, जनहित पतसंस्थेचे संस्थापक संतोष तौर,पत्रकार प्रमोद पाटील, चेअरमन माशाळकर सर, व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे, समाधान भगत, अभिजित कुलकर्णी, अभिजित पाटील, रमेश बारकुल, अतिश राऊत, निशांत कांबळे, जिवन जाधव सह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments