Subscribe Us

पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.


 संग्रहित चित्र
उस्मानाबाद / तेरणेचा छावा:-
     कळंब तालुक्यातील हावरगाव येथील पत्रकार संदीप कोकाटे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 3 गावगुंडाविरोधात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.परंतु त्या आरोपींना अटक कधी होणार त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी  जिल्हाभरातील पत्रकारातून होत आहे
       पत्रकार संदीप कोकाटे यांचे आई वडील हावरगाव येथे राहतात 21 डिसेंबर रोजी संदीप कोकाटे हे गावातील कोल्हे किराणा दुकानात पेन खरेदी करण्यासाठी गेले होते यावेळी तेथे अतुल आबासाहेब कोल्हे दुकानात आलेला होता यातील काही जणांनी आमच्या सरपंचाला जामीन मंजूर झाला आहे असे म्हणत कोकाटे यांच्याकडे दगड भिरकावला परंतु त्यांनी ते हुकवला नंतर त्यांना चापट मारली यानंतर दुपारी अतुल आबासाहेब कोल्हे ,विष्णू यादव कोल्हे ,अविनाश चौधरी यांनी आमच्या सरपंचाच्या जमिनीची बातमी तुझ्या वर्तमानपत्रात लाव तसेच आमच्या सरपंचाच्या विरोधात याआधी बातम्या का लावल्या इथून पुढे आमच्या विरोधात बातम्या छापायच्या नाहीत असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी जात कोकाटे यांनी कळम पोस्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.यानुसार    अतुल कोल्हे ,विष्णू कोल्हे, अविनाश चौधरी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यमव्यक्ती व प्रसार माध्यम संस्था हिसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 अंतर्गत  कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे परंतु सदर आरोपी गावगुंड असून यांच्या विरोधात याआधीही अनेक स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा या गावगुंडांना तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारातून होत आहे.

Post a Comment

0 Comments