Subscribe Us

येडशीच्या ग्रामपंचायत चा कारभार पवारांच्या हाती.


येडशी/ तेरणेचा छावा:-
        येडशी च्या सरपंचपदी येडशी विकास पॅनल च्या डॉ सोनिया प्रशांत पवार तर त्याचे पती प्रभाग ६ मधून त्याचे  पती प्रशांत पवार ही विजयी झाल्याने पती पत्नी ग्रामपंचायत मध्ये दिसणार आहे.त्यामुळे येडशीचा कारभार आता पवारांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे.
         उस्मानाबाद तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या येडशी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी,भाजप प्रणित रामलिंग ग्रामविकास पॅनल व येडशी विकास पॅनल अशी तिरंगी लढत झाली.
      यामध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या डॉ सोनिया प्रशांत पवार  यानी २१७५ मते मिळवून सरपंच पदी विजयी झाल्या तर महाविकास आघाडीच्या शितल जयत भोसले यांना १८९०  तर भाजप प्रणित रामलिंग पॅनल च्या निता गजानन नलावडे यांना १७२५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या तर सरपंच सोनिया पवार याचे पती डॉ प्रशांत हरिश्चंद्र पवार हे प्रभाग ६ मधून ४२१ मते घेवून निवडूण आले तर महाविकास आघाडी ९ जागा जिंकल्या यामध्ये प्रिया शशांक सस्ते ३९३ ,स्वाती सुनील शेळके ३४० ,प्रताप दामोदर ढोणे ४२३ ,सिमरण फारूक सिकलकर ५१६ ,सारिका मच्छिंद्र पवार ५६२  शिदे मिथुन रामलिंग ६८७ ,सुनिल अशोक पाटील ४९१ ,शिदे मंजुषा दत्तात्रय ४७५ ,सरोज सतोष पवार ६६७ मते घेवून विजयी झाले तर भाजप  प्रणित  रामलिंग ग्रामविकास पॅनल चे महेश शितल पवार  ४३४ ,मगेश रामचंद्र देशमुख ३६७ ,लता विलास तौर ४६८ ,तुषार शहाजी शिदे ३४५ ,छाया आण्णा काबळे ५०२ ,मनोज राजेंद्र गुरव ३८६ तर महादेवी सोमनाथ बेद्रे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
       येडशी येथील नागरिकांनी अनेक मातब्बर पुढाऱ्यांना जमिनीवर आणण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.इथून पुढे येडशीच्या राजकारणात वेगळा पॅटर्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे लोक बोलून दाखवत आहेत त्यामुळे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीनिवडणुकी वेळी ही वेगळेच चित्र पहावयास मिळू शकते.

 उच्चशिक्षित सरपंच 
डॉ सोनिया प्रशांत पवार या डॉक्टर असून येडशी ग्रामस्थांनी  एका उच्चशिक्षित महिलेला संरपच म्हणून निवडणूक दिले आहे तर त्याचे पती ही डॉ प्रशांत पवार हे प्रभाग ६ मधून  निवडणूक आले असून  एकाच वेळेस पती,पत्नी ग्रामपंचायत मध्ये निवडणूक आले आहेत.

Post a Comment

0 Comments