दहिफळ/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील कलाकार योगराज पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर यांचे सिनेमा जगत व अभिनय क्षेत्र याविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
येथील जि प प्राथमिक शाळा व जि प माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत कार्यक्रम संपन्न झाला.योगराज पांचाळ हे लेखक कवी पत्रकार मुर्तीकार चित्रकार म्हणून कलाक्षेत्रात ओळखले जातात.वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातील कलाकारांना अभिनयाची माहिती व्हावी यासाठी सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना सिनेमा जगत व अभिनय क्षेत्रातील माहिती दिली.कुठलेही क्षेत्र असो गुरु शिवाय ज्ञान मिळत नाही.ज्ञान मिळविण्यासाठी गुरुंचा मान आदर ठेवला पाहिजे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.अभ्यासाशिवाय पर्याय नाही.आम्ही अभिनय क्षेत्रात काम करतो.तिथे ही अभ्यास करावा लागतो.पाठांतर करावे लागते.गुरु सांगेल तसे वागावे लागते.आपली मेहनत चांगली असेल तर नक्कीच यश मिळते.गायन, नृत्य,अभिनय, क्षेत्रात काम करायचे असेल तर त्याचे क्लास असतात.काॅलेज आहे.तिथे प्रवेश घेऊन कला अवगत करता येते.शालेय अभ्यासक्रमा बरोबर विविध कला विषयी आवड असली पाहिजे.कला माणसाला आनंदी ठेवते.नाव प्रतिष्ठा प्राप्त करून दिते असे तडवळकर म्हणाले.
ग्रामीण भागात राहून विविध कला अवगत करून आपली ओळख निर्माण करणारा योगराज पांचाळ एक आदर्श निर्माण करतो हे कौतुकास्पद आहे.वेबसिरीजच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना संधी आहे.आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ आहे.लहान भुमिका साकारली तर मोठ्या पडद्यावर झळकायला वेळ लागणार नाही.वेबसिरीजमध्ये संधी मिळत आहे.विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक वनवे,शिक्षक सावंत ,पाखरे ,भराडे ,घोडके, पाटील,कदम,अनपट, गायकवाड,शिक्षिका माने , बालाजी भातलवंडे, फुलचंद काकडे, प्रभाकर ढवळे, इस्माईल शेख रवी पौळ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
0 Comments