Subscribe Us

येरमाळा परिसरातील सुरक्षा उपाययोजनेसाठी पालकमंत्र्यांकडे साकडे.

येरमाळा/ तेरणेचा छावा:-
       रत्नापूर येथील युवक कार्यकर्ते विकास जाधवर यांनी येरमाळा व रत्नापूर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीसगस्त वाढविण्याची व इतर उपाययोजना करण्याची मागणी शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर ) रोजी पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
     याविषयी सविस्तर वृत्त असे की रत्नापुर ता. कळंब येथे शनिवार  (दि.5 नोव्हें) रोजी मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची घटना घडलेली आहे तसेच महामार्गावर येरमाळा -तेरखेडा दरम्यान अनेक वेळा वाहने लुटण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. ज्यामुळे येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांमध्ये व रत्नापूर गावातील टेकाळे वस्ती भगत वस्ती व जाधवर वस्ती येथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच सदर लोकांची शेती व घरगुती मालमत्तेविषयी भीती निर्माण झालेली ,आहे,परिसरातील लोक सध्या भयग्रस्त वातावरणात राहत आहेत.
   तरी पालकमंत्र्यांनी आपल्या स्तरावरून सहाय्यक निरीक्षक पोलीस स्टेशन येरमाळा यांना हद्दीत गस्त घालणे व वाढवणे  व सुरक्षितता बाबतीत इतर उपाययोजना याबाबत सूचित करण्याची मागणी निवेदनात केलेली आहे.

Post a Comment

0 Comments