Subscribe Us

सरपंच चरणेश्वर पाटील यांची खंडेश्वरी यात्रा कमिटी अध्यक्षपदी निवड


दहिफळ / तेरणेचा छावा:-
दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडेश्वरी ( सटीची) यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी चरणेश्वर पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
चंपाषष्ठी निमित्त ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानची सटीची यात्राभरत असते  यावर्षीयात्रेचे नियोजन करण्यासाठी रविवार दि.13 नोव्हेंबर रोजी  खंडोबा मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
   यावेळी यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी चरणेश्वर पाटील यांचे नाव सुचविले..यावेळी उपस्थितानी टाळ्या वाजवत बोला बोला येळकोट घे खंडेराय महाराज की जय अशा घोषणा देत सहमती दर्शवली याप्रसंगी वारुवाले, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    गेल्यावर्षीच्या यात्रेतील शिल्लक रकमेची माहिती चरणेश्वर पाटील यांनी दिली.तर काही राजकीय द्वेशापोटी नागरिकात संभ्रम निर्माण करतात.सगळा हिशोब आम्ही बॅनर लावून नागरिकांना दिला .आम्ही गावात चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करत असतो.गावाचा विकास हाच आमचा ध्यास आहे.
मी सरपंच असे पर्यंत तिर्थक्षेत्राचा विकास करणार यात शंकाच नाही.खंडोबा देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.परंतु सत्ता बदला मुळे निधीमध्ये थोडी अडचण निर्माण होत आहे परंतु प्रयत्न करून निधी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे  सरपंच चरणेश्वर पाटील यांनी सांगितले..
       वारुवाले यांनी मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण काढावे.असा प्रस्ताव सादर केला.याविषयी पाटील म्हणाले की मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण नक्की काढू.परंतू व्यवसायिकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल.व्यवसाय ही महत्त्वाचा आहे.बाजारपेट असेल तरच मंदिराला महत्व राहणार आहे.यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.शरणेश्वर पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नारळ फोडून भंडारा लावून जयघोष करण्यात आला.
     बैठकीसाठी चेअरमन मधुकर भुसारी ,उपसरपंच अभिनंदन मते,मा.उपसरपंच बालाजी मते, समाधान मते, बाबासाहेब भातलवंडे, जयवंत भातलवंडे, , सुधीर मते, वसंत धोंगडे,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य अदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
        अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ग्रामस्थ ,परिसरातील मित्रपरिवार ,आप्तेष्ट यांच्यातून चरणेश्वर पाटील यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments