Subscribe Us

अखेर संजय राऊत जेलबाहेर शिवसेना ठाकरे गटाकडून धाराशिव मध्ये जल्लोष .


उस्मानाबाद / तेरणेचा छावा:- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई येथील सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मंजूर करून त्यांची सुटका करण्यात आली  त्यामुळे उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने दि.९ नोव्हेंबर रोजी फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
           कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खा. राऊत यांच्या जामीन अर्जावर आतापर्यंत मुंबई न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. परंतू अखेर दि.९ नोव्हेंबर रोजी खा. राऊत यांना जामीन मंजूर केला आणि संजय राऊत जेल बाहेर आले. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्तामध्ये प्रचंड जल्लोष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले     
       राज्यात काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन व्यवहार प्रकरणांमध्ये शिवसेनेचे नेते खा राऊत यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने जूनमध्ये ताब्यात घेतले होते. बरेच दिवस चौकशी होऊन नंतर खा राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांचा मुक्काम हा ऑर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला होता. मात्र अखेर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केल्याने उस्मानाबाद येथील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, दिलीप पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे,  उपशहर प्रमुख बंडू आदरकर, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, एच. एम. देवकते, माजी पंस सदस्य संग्राम देशमुख, पंकज पाटील, रवी वाघमारे, गणेश खोचरे, अतिश पाटील, सुरेश गवळी, मनोज केजकर, गफूर शेख, मनोज साठे, दिनेश बंडगर, कृष्णा साळुंके, गणेश साळुंके, संकेत सुर्यवंशी, रवी कोरे, पिंटू आंबेकर, सादिक शेख, महेश लिमये, सत्यजित पडवळ, विजय ढोणे, सतीश लोंढे, बापू पडवळ, निलेश साळुंके आदीसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments