Subscribe Us

चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपन्न


चार लाख पन्नास हजार मे.टन. गाळपाचे उद्दिष्ट 
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती करणारा उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील
धाराशिव साखर कारखान्याचा अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन  वसंतराव नागदे, संचालक  विश्वास आप्पा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व धाराशिव साखर कारखान्याचे मार्गदर्शक अभिजीत आबा पाटील हे उपस्थित होते यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संजय खरात या दांपत्याच्या हस्ते मोळी पूजन करून करण्यात आले.
        यावेळी वसंतराव नागदे म्हणाले की; बँक ही एक यशस्वी उद्योगपतीच्या मागे सदैव उभे असते. ज्याचा व्यवहार आणि प्रामाणिकता शेतकऱ्यांसाठी तळमळ असलेले अभिजीत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडे बघून आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्याने सन 2021- 22 मधील उसाचे पेमेंट 2200 रुपये प्रमाणे अदा केले असून तोडणी वाहतुकांची बिले अदा करण्यात आलेली आहेत तसेच हंगाम 2022-23 च्या हंगामात 4 लाख 50हजार मे.टन गाड्या उद्दिष्ट ठेवले असून उसाच्या उपलब्ध नुसार कारखान्याची गाळप क्षमता आणि तसेच असावणी प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचे येईल असे धाराशिव कारखान्याचे मार्गदर्शक व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले.
      यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक रणजीत भोसले, विकास काळे, सुरेश सावंत, संजय खरात, संदिपान खारे, सुहास शिंदे तसेच तेरणा सहकारी साखर कारखाने माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, चोराखळीचे सरपंच खंडेराव मैदाड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, महेश खटके, नवनाथ नाईकनवरे तसेच मल्टीस्टेट चेअरमन सुरज पाटील, सुरेशतात्या पाटील केज, इंगोले सर तसेच अशोक देवरे तसेच कारखाने जनरल मॅनेजर ए.एस पठाण, शेतीअधिकारी श्री दयानंद गव्हाणे, शेती अधिकारी अकाउंन्ट प्रवीण बोबडे, चिप काउंटर केमिस्टर बाळासाहेब पेटे, वैभव देशमुख, ज्ञानेश्वर कोळगे, बाळासाहेब वाडेकर, सुनील लोमटे, तसेच कारखान्यातील कर्मचारी अधिकारी कामगार व भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments