Subscribe Us

शिधापत्रीका धारकांना आनंदाचा शिधाबाबत आवाहन, जेवढ्या वस्तू आहेत तेवढे घेऊन जाणे.


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
       तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रीका धारकांना (अंत्योदय लाभार्थी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एपीएल शेतकरी लाभार्थी ) दिवाळी सणानिमीत्त मिळणारा आनंदाचा शिधा, चार वस्तुची कीट शिधापत्रीका धारकांना वितरीत करण्याचे शासनाने आदेश दिले आहे. परंतू प्रत्येक रास्तभाव दुकानापर्यंत दिपावली सणामध्ये पोहोच करणे शक्य नसल्याने ज्या वस्तु प्राप्त झालेल्या आहेत त्या प्रत्येकी वस्तु 25/- रुपये प्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्याचे शासनाने सुचित केले आहे. तेंव्हा आपले रास्तभाव दुकानात ज्या वस्तु प्राप्त आहेत त्या खरेदी कराव्यात उर्वरीत वस्तु उपलब्ध झाल्यानंतर आपआपल्या रास्तभाव दुकानातून घेऊन जाण्यात यावेत. वस्तु घेऊन जाते वेळेस प्राप्त झालेल्या वस्तुच्या समोर स्वाक्षरी करावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे आणि तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments