तेरणेचा छावा/दहिफळ:-
. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिफळ येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर दहिफळ येथे पवनराजे फाउंडेशन द्वारे गुरूवार दि. 03/11/2022 रोजी !!माझी शिधापत्रिका माझा हक्क!! व ई-श्रम कार्ड नोंदणी या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे..
या शिबिरामध्ये आपले रेशनकार्ड विषयी खलील समस्यांचे निवारण केले जाईल
१) रेशनकार्ड मध्ये नावं वाढविणे २) रेशनकार्ड मधील नाव कमी करणे. ३) रेशनकार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास दुसरी प्रत मिळवणे. ४)रेशनकार्ड मधील नावामध्ये दुरुस्ती करणे.५) नावे ऑनलाईन करणे.
नाव वाढविण्यासाठी लागणारे कागदपत्रे
१) नमुना अर्ज क्र. ८ (कार्यक्रम ठिकाणी मोफत मिळेल)
२) ज्या रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करायचे आहे ते मुळ रेशनकार्ड.
३) मुळ रेशनकार्ड मधुन नाव वगळले असल्याचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र लागेल.*(एखादी महिला विवाह नंतर सासरी आली असेल व तिचे नावं सासरी नोंदवायचे असेल तर माहेर कढील तहसीलदार यांचे नावं कमी केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल)*
३) कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आधार कार्डची झेरॉक्स एका कागदावर.
४)लाहन मूलांचे बोनाफाइड किंवा जन्मचा कसलाही पूरावा
रेशनकार्ड मधून नाव कमी करायचे असल्यास लागणारे कागदपत्रे
१) नमुना अर्ज क्र. ९ (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
२) शपथपत्र (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
३) ज्या रेशन कार्ड मधील नाव कमी करायचे आहे ते रेशन कार्ड.
४) कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आधार कार्डची झेरॉक्स एका कागदावर.
रेशन कार्ड हारवले किंवा खराब झाले असल्यास दुसरे रेशन कार्ड मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्रे :
१)नमुना अर्ज क्र. १५ (कार्यक्रम ठिकाणी मोफत मिळेल)
२) शपथपत्र (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
३) दुकानदाराचे सही केलेलं प्रमाणपत्र (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
३) असल्यास मुळ रेशनकार्ड किंवा झेरॉक्स.
४) रेशन कार्डवर नाव असलेल्या सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स एका कागदावर.नावामध्ये चूक झाली असल्यास त्यात दुरुस्ती करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
१) नमूना अर्ज क्र. १४ (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
२) शपथपत्र (कार्यक्रम ठिकाणी मिळेल)
३) ज्या रेशन कार्ड मध्ये नावाची चुक झाली आहे ते मुळ रेशन कार्ड.
४) कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स एका कागदावर.
नावे ऑनलाईन करणे
१) कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स एका कागदावर.
२)रेशनकार्डची झेरॉक्स
*ई - श्रम कार्ड नोंदणी कागदपत्रे*
१) आधारकार्ड
२) बँक पासबुक
३) मोबाईल नंबर
8830290208,9359585236 . चरणेश्वर पाटील 9423336136 ऋषिकेश पाटील 7745037877 नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन सरपंच चरणेश्वर पाटील व युवा शिवसेना नेते ऋषिकेश पाटील केले आहे.तसेच या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments