धाराशिव/ तेरणेचा छावा:-
येरमाळा येथील जनहित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, औरंगाबाद विभागातील 10 कोटी ते 50 कोटी ठेवी असलेल्या गटातून ,तिसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सन 2021 ते 2022 चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार देऊन, गौरविण्यात आले ,हा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी पतसंस्थेला मिळाला आहे गणपतीपुळे येथे, रविवारी राज्य फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, पतसंस्थेचे संस्थापक प्रा. संतोष तौर ,चेअरमन वल्लभ माशाळकर, व्हा. चेअरमन नितीन कवडे , संचालक शिवाजी आप्पा जाधवर ,गणेश मोरे, बळीराम नवले, रामकिसन कोकाटे, सुनिल शिंदे, गोवर्धन उगडे, दत्तात्रय रणसिंग, अंकुश भगत, कर्मचारी अभिजीत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला, संचालक मंडळाचे पारदर्शक कामकाज , प्रशिक्षीत कर्मचारी, व र्तत्पर सेवा ,संक्षिप्त ठेव प्रतिनिधीचे ठेव वृद्धीचे कामकाज ठेवीदार ,सभासद व कर्जदार यांच्या सहकार्याने, हा दीपस्तंभ पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराने प्रेरणा घेऊन भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी चालना व प्रोत्साहन मिळाले आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी व्यक्त केली आहे.
सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाचा असणारा दीपस्तंभ पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी जनहित पतसंस्थेला मिळाल्यामुळे जनहित पतसंस्थेचे सभा सभासद ,ठेवीदार जिल्हाभरातील पतसंस्था सहकारी क्षेजात काय करणाऱ्या संस्थेकडून,मित्रपरिवार व जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
0 Comments