धाराशिव/ तेरणेचा छावा:-
वृंदावन फाऊंडेशन व विवेक व्यासपीठ आयोजित गुरुजन गौरव सोहळा 2022 जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज ह भ प शिवाजीराव मोरे महाराज
व Dr अर्चना कुडतरकर
(कार्यकारी संपादीका शिक्षण विवेक ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, प्रशासकीय भवन,ज्ञानेश्वर पादुका चौक,एफ.सी.रोड पुणे येथे संतोष तुकाराम आगलावे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तोपासक (समन्वयक - संत तुकाराम - नामदेव अध्यासन केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे होते तर प्रमुख उपस्थिती श्री चव्हाण (संचालक एस.एन.डी.टी.महीला विद्यापीठ मुंबई ) हे उपस्थित होते.वृंदावन फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत असलेल्या निवडक आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
संतोष आगलावे यांना गुरुजन पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल येरमाळा व परिसरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments