कळंब/ तेरणेचा छावा:-
डिकसळ ता.कळंब येथील विविध कार्यकारी सेवा सोयायटीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 10 जागा काँग्रेस प्रणित नुतन संचालकांनी बिनविरोध विजय मिळविल्याबद्दल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब यांनी उमेदवारांचा शाल फेटा हार घालुन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मंञी मधुकरराव चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष निरज भैय्या पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवार नुतन संचालक श्री. कुंभार पांडुरंग गुणवंतराव ,श्री.अंबिरकर दत्ताञय बाबुराव ,श्री जाधव रामेश्वर सुरेश,श्री. मैदाड विश्वंभर भागवत,श्री काळे राजेंद्र दत्तोबा, श्री.वनकळस हरिदास निवृती श्री.जाधव रामचंद्र केशव,श्री अंबिरकर संतोष जोती,श्री सौ अंबिरकर सिंधूबाई कचरू,श्री अंबिरकर महादेव देविदास, यांच्यासह हे विजयी पॅनल शेतकरी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील याची खात्री बसवराजी पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याच्या दृष्टीने सोसायटी हा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून शेतक-यांच्या गरजा ओळखून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी अधिक सक्षमपणे व सर्वसमावेशक कार्य करण्याचे आवाहन केले.तसेच डिकसळ व कळंब परिसरातील शेतकऱ्यांना ऊसा संदर्भात विठ्ठल साई मुरूम कारखाना मार्फत लागेलती मदत करण्याचे आश्वासन नुतन संचालक यांना दिले.
याप्रसंगी उस्मानाबाद जनता बँकचे संचालक आशिष मोदाणी, उस्मानाबाद काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,ओ बी सी विभाग काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत,माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,बिलाल कुरेशी,विद्यार्थी काँग्रेस कार्याध्यक्ष सौरभ गायकवाड,मधूकर काळे,किसन उर्फ दादा अंबिरकर,गोरख अंबिरकर,कचरू आबा अंबिरकर,ताजोद्दिन सय्यद. यांची उपस्थिती होती.
0 Comments