Subscribe Us

बेल्स निधी बँकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा


उस्मानाबाद / तेरणेचा छावा:-
   उस्मानाबाद येथील बेल्स निधी लिमिटेड चा प्रथम वर्धापन दिन सुनील प्लाझा येथील सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब हरिश्चंद्र पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प . सौ.जागृती जगदीश जहागीरदार (भागवताचार्य) व 
 ह .भ .प .निलेश भैय्या झरेगावकर महाराज (मुख्य प्रवर्तक वारकरी आचार संहिता परिषद महाराष्ट्र राज्य) हे होते. तसेच व्यासपीठावर
 सुभाष रामराव पवार पाटील (संचालक यशदा मल्टीस्टेट उस्मानाबाद) पंकज पडवळ (सचिव दिशा नागरी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद ) उपस्थित होते.
    मान्यवरांच्या  हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून ,उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार बेल्स निधी लिमिटेडचे चेअरमन तथा दैनिक कुलदैवत चे संपादक दिपक लोंढे, व्हाईस चेअरमन अडव्होकेट भाऊसाहेब बेलूरे, चिफ फायनान्शियल ऑफिसर दिनेश घेवारे, संचालक महादेव लिंगे, नरहर पाठक ,बलराज सरकाले, श्रीमती निर्मला पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
 तर, उत्तम सूत्रसंचालन करणाऱ्या राणीताई कुदळे यांनी स्वागतम.... शुभ... स्वागतम ...आनंद मंगल.... मंगलम ....हे स्वागत गीत गाऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली .
बेल्स निधी लिमिटेड चा लेखाजोखा मांडताना व्यवस्थापक दिनेश घेवारे यांनी सांगितले की , बेल्स निधी लिमिटेड चा शुभारंभ 17 सप्टेंबर 2021 रोजी झाला असून ,त्याच दिवशी आदर्श बँकिंग सेवा देण्याचा आम्ही संकल्प केलेला होता. ठेवीदारांचा विश्वास ,गरजू होतकरू यांना कर्जवाटप करून योग्य समन्वय ठेवला.आज रोजी भाग भांडवल सहा लाख असून, ठेवी 40 लाख आहेत. तर कर्ज 32 लाखाचे वाटप झालेलेआहे .
यापुढेही आम्ही नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रगती करणार असल्याचे घेवारे साहेब यांनी सांगितले.
     या प्रसंगी ह .भ .प. निलेश भैय्या झरेगावकर महाराज आपले शुभ विचार व्यक्त करताना म्हणाले की,
     " नमो सद्गुरु तुकया, ज्ञानदीप नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर अपूर्ण कीर्ती ."
आज निधी लिमिटेड या बँकेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत .व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव चे माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन आपल्या सगळ्यांचेच आदरणीय आणि श्रद्धास्थान असलेले हरिभक्त परायण नानासाहेब पाटील काका या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले .    त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या घरी अखिल कोट ब्रम्हांडनायक पांडुरंग परमात्म्याने छत्तीस वर्षे पाणी भरावा ,दत्त भगवंताने ज्यांच्या घराची चोपदार की करावी त्या पैठणच्या संतश्रेष्ठ श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या तेराव्या पिढीतील सुनबाई भागवत कथाकार तसेच  कीर्तनकार हरिभक्त परायण जागृती ताई जगदीश जहागीरदार  याही आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. त्याचबरोबर इतर बँकिंग क्षेत्रातील सर्व मान्यवर बेल्स निधी लिमिटेड या बँकेचे सर्व विश्वस्त मंडळ आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही श्रोते .
 बँकेविषयी म्हणजे बेल्स निधीमध्ये साधं माझं खातं सुद्धा नाही .पण तरीसुद्धा यांनी मला आमंत्रित केल्यामुळे थोडासा बँकिंग क्षेत्रातला अभ्यास करायची संधी मला  दिली त्यामुळे या विश्वस्त मंडळाचे ,बँकेचे चेअरमन आमचे दीपक लोंढे साहेब यांचा सुद्धा मी या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करून महाराज आपल्या अभ्यासातून विशेष माहिती सांगतात की, आपल्या भारत देशामध्ये बँकिंग व्यवहार कधीपासून सुरू झाली? पहिली बँक भारतामध्ये   1770 मध्ये   स्थापना झाली. बँकेला मद्रास बँक ऑफ कोलकाता, आणि बँक ऑफ बॉम्बे ह्या बँकात ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये निर्माण झाल्या ह्या तिन्ही बँकांची एक बँक निर्माण झाली आहे आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया त्या बँकेला नाव देण्यात आलं. 
त्यानंतर 1955 सा ली ह्याच इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं भारतीय स्टेट बँक हे नामांतर झालं.असे सांगून पुढे सांगतात की,  
चाणक्यांनी अर्थशास्त्र नामक ग्रंथाची निर्मिती केली. हजारो वर्षांपासून बँकेचे व्यवहार चालू होते पण ते खाजगी सावकारी पतपेढ्यांमध्ये त्या स्वरूपामध्ये त्या बँकेचे व्यवहार चालू होते असे बोलून त्यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्या नंतर आपले विचार व्यक्त करताना भागवताचार्य  जागृती जहागीरदार म्हणाल्या की,
    खरंतर माझ्या आयुष्याचे कित्येक वर्ष असे निवेदनामध्ये गेलेले आहेत कमीत कमी तीन हजार प्रोफेशनल अँकरिंग चे प्रोग्राम झालेले आहेत आणि पंधरा वर्षे औरंगाबाद आकाशवाणी केंद्रामध्ये नोकरी केलेली त्यामुळे माईकचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे.  आपल्या धाराशिव मध्ये येऊन मला एकच वर्ष झालेला आहे आणि या एक वर्षांमध्ये खूप प्रेम मिळालं  नानासाहेबांची ओळख सगळ्यांच्या मुखामध्ये नाही तर हृदयामध्ये आहे ऋषीतुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि आज खरोखरच मी धन्य आहे की आज त्यांच्या शेजारी बसण्याचा मान बेल्स लिमिटेड ने मला प्रदान केल आहे. 
   या कार्यक्रमाला जशी मान्यवरांची आणि पुरुषांची गर्दी आहे तशीच स्त्रियांची पण मोठ्या संख्येने गर्दी आहे .हा आनंद व्यक्त करून जाग्रती ताई पुढे उपदेश करतात की ,
 बँकेचा व्यवहार ,बँक यासाठी आमच्या देवतांमध्ये आम्ही कुणाला जास्त वंदन करतो तर      प्रत्येकाला इच्छा असते की, कुबेरा सारखं धन माझ्याकडे यावं आणि त्यासाठी आम्ही महिला जरा जास्त आटोकाट प्रयत्न करतात.  प्रपंचामध्ये अर्थ असावा प्रपंचामध्ये जर अर्थ नसेल तर खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होत नाही आणि जर परमार्थातला अर्थ गवसला नाही तर खऱ्या अर्थाने पारमार्थिक म्हणण्यात अर्थ नाही तर धर्म, अर्थ ,काम ,मोक्ष, यामधला जो अर्थ आहे हा अर्थ धर्माला आणि मोक्षाला अनुसरून जर वापरलेला असेल तर तो कामाला बाजूला सारतो मर्यादित ठेवतो हे वेगळेपणाने सांगायची गरज नाही. 
प्रपंचातला जो अर्थ आहे त्या अर्थासाठी आम्हाला प्रत्येकाला बचत करावी लागते आणि ताईंनी निवेदनामध्ये सांगितलेलं मला खूप आवडलं बेल्स चे अनेक अर्थ सांगितले त्यांनी त्यातला बेल्स म्हणजे गजर आणि आम्ही प्रापंचित प्रत्येक जनमत्व स्त्री असो पुरुष असो प्रत्येक जण गजराकडे जास्त लक्ष ठेवतो आणि हा गजर कशाचा तर प्रत्येक ठिकाणी दक्ष राहण्याचा दक्ष राहून जर लक्ष ठेवलं तर अर्थाकडचा अर्थ निरर्थक हा कधीच होत नसतो आणि या अर्थप्राप्तीसाठी परमार्थ हा प्रत्येकाच्या अंगी पुरवण्यासाठी या व्यासपीठावर जे मान्यवर आहेत नानासाहेब त्यांच्या संगतीमध्ये जर आपण राहत गेलो तर या प्रपंचातला अर्थ आणि परमार्थाचा अर्थ प्रत्येकाला नक्कीच प्राप्त होणार मग प्रपंचामध्ये काय आणि परमार्थ मध्ये काय प्रपंचामध्ये दहा-दहा रुपये अगदी म्हणजे मला तर आठवतं मी लहान असताना आम्ही बँकेमध्ये खाते उघडत होतो साधारण 1985 पर्यंत दहा रुपये म्हणजे भरपूर असायचे घरून जेव्हा दहा रुपये मिळायचे आम्हाला बँकेमध्ये टाकायचे  मी बचत केली विचार करा दहा-दहा रुपये ही बचत करत अशी जर दहा हजार लोकांनी बचत केले तर त्याचा आकडा जातो एक कोटीपर्यंत अगदी अल्पबचत दहा रुपयाचे आणि परमार्थामध्ये जर याचा विचार केला तर भगवंताची दहा नाव आहेत हे दहा नावं जर आम्ही दहा हजार वेळा उच्चारले तर ते नामस्मरण  एक कोटीपर्यंत होणार.
 हेच आम्ही प्रपंच आणि परमार्थ साधत असताना नामांचाही अर्थ आणि अर्थाचाही अर्थ जर जाणून पुढे पुढे गेलो डिपॉझिट करणारे डिपॉझिटर्स असंख्य आहेत अगदी कमीत कमी कमी गुंतवणूक करतात आणि हे प्रत्येक ठिकाणी विखुरलेले आहेत  . पण या प्रत्येकामध्ये काय आहे तर चैतन्य आहे आणि तेच चैतन्य परमार्थ प्रपंचामध्ये जर विचार केला तर ते चैतन्य त्याचा सुगावा घेण्यासाठी असावा लागतो.असे सांगून पुढे उपदेश करतात की, 
चलनाची जर प्राप्ती झाली जेव्हा आपल्याजवळ योग्य असतं तेव्हा आम्ही निस्वार्थ सेवा करू शकतो आणि ज्याच्याकडे चलन अल्प रूपाने आहे त्यालाच आम्ही निस्वार्थ सेवा करा म्हणलं तर त्यामध्ये तो आम्ही त्याच्यावर केलेला अन्याय होतो कारण शेवटी आम्हाला प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी चलनाची प्राप्ती होणे गरजेचे आहे आणि हेच चलन अल्प संख्येने म्हणजे अगदी कुणी थोडे थोडे पैसे गुंतवत जर राहिले तर आमच्या या बेल्स समिती लिमिटेड चा महासागर हा कधी होईल हे सांगता येत नाही.   निधी लिमिटेड ने एक वर्ष पूर्ण केलं याचाच अर्थ ही यशस्वी घोडदौड अविरतपणे पुढे चालू राहणारच आहे. बँकेसाठी आणि प्रपंचिकांसाठी सगळ्यात महत्त्वाच काय आहे तो विश्वास .आणि हा विश्वास जिंकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी हा खूप झाला.  आपली ही प्रगती तर उत्तरोत्तर होत राहो आणि आपल्या सगळ्यांची ही भेट होत राहो ,जय हिंद जय महाराष्ट्र.
शेवटी अध्यक्ष भाषणात नानासाहेब देशमुख यांनी आपले मौल्यवान विचार व्यक्त करताना म्हणाले की, 1770 ते 2022 पर्यंत बँकांचे स्वरूप खूप बदललेले असून ,आता हे छत्र खूप तांत्रिक झालेल आहे .सर्वसामान्य माणसाला खाजगी सावकाराकडून अवाजवी व्याज लावून पिळवणूक केली जात होती त्यासाठी योग्य ते व्याज आकारून गरजूंना कर्ज पुरवठा व्हावा यासाठी बँका काढण्यात आल्या. परंतु आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की फक्त ठेवीदारांचं स्वागत केलं जातं. तर कर्जदारांना नाकारल जात हे योग्य नसून ठेविदार हा तुमच्याकडून व्याज घेऊन जातो, तर कर्जदार हा तुम्हाला व्याज देऊन जातो. हे लक्षात ठेवाव ज्या वेळेस मी उस्मानाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस बराच अनुभव आलेला असून ,काही प्रयोग केलेले होते ते सिद्ध ही झालेले आहेत .कर्ज देताना चुकीच्या आणि निकस्या मुळे कर्ज बुडण्याचा धोका होतो.
 ऐपती पेक्षा जास्त कर्ज दिल्याने वसुली होऊ शकत नाही. कर्ज देण्याच्या तिप्पट तारण असले पाहिजे व एन पी ए वाढवणे हा बँकेसाठी धोक्याची सूचना आहे .गरजू होतकरू व्यक्तींना कर्ज देऊन त्याचे हप्ते वेळेत येण्यासाठी सतत संपर्कात राहिले पाहिजे तरच बँक आणि कर्जदार यांचे नाते अबाधित राहू शकते .
अशा प्रकारे नानांनी आपल्या स्व अनुभवातून वेगवेगळे दाखले देऊन बँका प्रगतीपथावर जाण्यासाठी मोलाचे मौल्यवान विचार व्यक्त केले .
अशाप्रकारे शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी बे ल्स निधी लिमिटेड चे सभासद ,ठेवीदार ,कर्जदार, हितचिंतक ,मित्र ,सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचा कर्मचारी स्टॉप व संचालक मंडळाने उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केले

Post a Comment

0 Comments