येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड दहिफळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 12 सप्टेंबर रोजी पार पडली.या निवडणुकीत 2 पॅनल आमने-सामने उभा होते.विविध कार्यकारी सोसायटी 13 सदस्य आहेत एक जागा बिनविरोध आल्याने 12 जागेसाठी ही निवडणूक होत होती.
ही निवडणूक बिनविरोध होणार असे वाटत असतानाच काही जण पॅनल बनवण्यासाठी नागरिकांना प्रवत करत होते.सभासद उमेदवारांची जमवाजमव केल्यानंतर काही जणांनी परतीचा मार्ग धरला.त्यामुळे विरोधी पॅनलची पंचायत झाली.तरीही द्विधा मनस्थितीत नको होय नको होय करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
श्री खंडेश्वरी शेतकरी विकास पॅनल व जय मल्हार मार्तंड सोसायटी बचाव पॅनलया दोन पॅनल मध्ये आमने सामने लढत झाली.
या निवडणूकीत दोन्ही बाजूस एकमेकावर आरोप प्रत्यारोपमुळे ही मोठी रंगत आली होती.
गेल्या 20 वर्षापासून मधुकर भुसारी यांची सोसायटीवर एक हाती सत्ता आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी
झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मधुकर भुसारी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यामुळे दहिफळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दुबळी झाली परिणामी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही उमेदवार निवडणुकीत मिळाला नाही.
या निवडणुकीत भाजप शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना यांच्यात लढत झाली.यात शिवसेना पुरस्कृत श्री खंडेश्वरी सोसायटी विकास पॅनलने एक उमेदवार बिनविरोध निवडून आणून आघाडी घेतली होती.प्रथमता निवडणूक एकतर्फे होईल वाटत असतानाच अचानक रंगत आली परंतु शेवटी शिवसेना पुरस्कृत पॅनलने बहुमताने सर्वच्या सर्व जागा जिंकल्यामुळे पुन्हा एकदा मधुकर भुशारी यांनी विविध कार्यकारी सोसायटीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत नंतर सोसायटीही शिवसेनेच्या ताब्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे माहीत होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाके फोडून विजय उमेदवारांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
0 Comments