धाराशिव/ तेरणेचा छावा:-
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब, खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत व सहकक्षप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी दिले आहे.
शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपण गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10 टक्के राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रूग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णालयांमध्ये गरजू रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आपण सदैव तत्पर राहावे असे निवड पत्रात म्हटले आहे. तसेच गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब, गरजू रूग्णांना भरीव प्रमाणात अर्थसाह्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धीविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, कोपरी (ठाणे) येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही निवड पत्रात नमूद केले आहे. या निवडीचे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
0 Comments