धाराशिव/तेरणेचा छावा
मलकापूर येथील लोमटे महाराज यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार असलेले स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजाने महिला भक्ताचा विनयभंग केला होता.
दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजां विरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त एका महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजां विरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाले होते.यादरम्यान महाराजाकडून अटकपूर्व जमिनीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज करण्यात आला होता. 30 सप्टेंबरला 13 दिवसाचा तात्पुरता अटकपूर्व जामीन ही मिळाला होता. त्यानंतर मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी न्यायालयमध्ये सुनावणी घेतत्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर त्यांना 45 दिवसा नंतर कळंब पोलिसांनी बुधवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली आहे.
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे.
महाराज यांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून या मध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
दरम्यान, लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजा यांच्यावर या पूर्वीही जादूटोणा व लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
लोमटे महाराजांविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण तपास करून यातील या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी जनतेमधून होत आहे.
0 Comments