Subscribe Us

जनहित पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार जाहीर


 
येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येरमाळा येथील जनहित सहकारी पतसंस्था  या संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चा अत्यंत मानाचा समजला जाणारा औरंगाबाद विभागातून तृतीय क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. 
    सदर पुरस्कार वितरण  समारंभ महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत,सहकार मंत्री  अतुलजी सावे,,सतिशजी मराठे, संचालक,भारतीय रिझर्व्ह बँक,.उदय जोशी, महामंत्री,सहकार भरती व .विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बँक.यांचे उपस्थितीत  दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी गणपती पुळे येथे दुपारी १२.३०वाजता प्रदान करण्यात येणार आहे . या संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रा..संतोष तौर, चेअरमन श्रुतीताई वल्लभ माशाळकर, व्हा.चेअरमन नितिन कवडे, संचालक बळीराम नवले, रामकिसन कोकाटे, दत्तात्रय रणसिंग, गोवर्धन उगडे, सुनिल शिदे,गणेश मोरे,शिवाजी जाधवर,अंकुश भगत, कर्मचारी, समाधान भगत, अभिजित कुलकर्णी, अभिजित पाटिल, रमेश बारकुल, निशांत कांबळे, पवण ओव्हाळ, रोहीत घेवारे, जिवन ओव्हाळ ,व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे  यांचे या यशाबदल सभासद, ठेवीदार, खातेदार, व ग्रामस्त यांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.
     ग्रामीण भागातून जनहित पतसंस्थेने घेतलेल्या या उत्तुंग भरारी बद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून जनहित परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments