वृंदावन फाऊंडेशन - विवेक व्यासपीठ आयोजित पुणे येथे १८ सप्टे. रोजी गुरुजन गौरव सोहळा
पुरस्कारासाठी राज्यातून १५ उपक्रमशील शिक्षकांची निवड
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा :-
वृंदावन फाऊंडेशन - विवेक व्यासपीठ, पुणे आयोजित गुरुजन गौरव सोहळा २०२१ - २२ रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, प्रशासकीय भवन,ज्ञानेश्वर पादुका चौक,एफ.सी.रोड पुणे येथे डॉ. अर्चना कुडतरकर (का. संपादिका, शिक्षण विवेक) यांच्या शुभ हस्ते तसेच ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज (जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे वंशज) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. डॉ. सुनिल गायकवाड (मा खासदार लातूर) असून श्री गायकवाड यांनी देश विदेशातून १७ पदव्या संपादन केलेल्या आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुभाष चव्हाण (संचालक, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई) प्रा. सोमनाथ लांडगे (शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते) असून यावेळी पुरस्कार प्राप्त गुरुजन प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण, राजेश डोमळे, संतोष आगलावे, श्री. व सौ. रोहिणी - दिलीप सोनकवडे, महादेव यादव, सौ. रेखा जेवळीकर, संपतराव देशमुख, तात्याबा कांबळे, सौ. पुनम गुजर, प्रो. डॅनियल पेणकर, रिया आळवेकर, एकनाथ चव्हाण, अमोल शिंदे, दिपक धामापूरकर, शंकर चौधरी यांचा सत्कार होणार आहे.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. अर्चना खंडागळे ,प्रा. अमेय महाजन प्रा. देवीदास बिनवडे, प्रा. अलका सपकाळ यांनी केले आहे
0 Comments