मोहा/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मोहा येथील मोहेकर उद्योग समूहाच्या नवीन मोहेकर स्टील इंडस्ट्रीज या कारखान्यांचा भव्य शुभारंभ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बुधवार (ता.०७) संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हातलाई शुगरचे अध्यक्ष सुधिर पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मोहेकर उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.हनुमंत (तात्या) मडके यांनी मोहेकर स्टील इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये कलर कोटिंग पञा,पन्हाळी पञा आदी तयार होणार असुन पञाची ठोक व किरकोळ दरात विक्री करणार आहोत याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
कार्यक्रमास एस.पी.शुगर चेअरमन सुरेश पाटील, रूपमाता उद्योग समुह चेअरमन व्यंकट गुंड, सिद्धिविनायक उद्योग समुहाचे चेअरमन दत्ता कुलकर्णी, यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन सुधीर सस्ते, तुळजापुर शुगर चे चेअरमन अनिल काळे, माऊली ॲग्रोटेकचे चेअरमन प्रशांत चेडे, लातूर शुगर चे चेअरमन व्यंकटराव बावणे, गुळमेश्वर शुगर चे चेअरमन बापूराव चव्हाण, साईप्रसाद ॲग्रोचे चेअरमन शांतिनाथ परभणे, घोलप इंडस्ट्रीज तेरखेडा चे विजय घोलप,आशापुरक ॲग्रोटेक बीड चे चेअरमन विनोद चरखा, पवार लोहेया शुगर परळी चे बळीराम पवार, विनय सहस्ञबुध्दे, सी ए प्रविण प्रजापती, कळंब चे पी.आय यशवंत जाधव, मोहेकर अॅग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेकर उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके, मोहेकर मल्टीस्टेट चे व्हा चेअरमन डॉ ज्ञानोबा जाधव, संचालक श्रीहरी बोबडे, दहिफळ चे सरपंच चरणेश्वर पाटील,मोहेकर स्टील इंडस्ट्रीज चे संचालक बाबासाहेब मडके, मोहा चे सरपंच तथा संचालक राजु झोरी, संचालक मनोज जोशी, उपसरपंच सोमनाथ मडके,अंनतराव मडके, धनंजय मडके, प्रमोद मडके, शेषराव मडके,अशोकराव मडके, संताजी वीर,बालाजी मडके, तसेच पंचक्रोशीतील नागरीक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ह.भ.प बापु जोशी यांनी मानले
मोहा येथील माळरानावर मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंता( तात्पा) मडके यांनीमोहेकर अग्रो या गूळ पावडरचे उत्पादन चालू करूनशेतकरी व शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तसेच त्यांनी आता मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचा शुभारंभ करून आणखी रोजगार व जिल्ह्यातील नागरिकांना साईज प्रमाणे व पत्रे ,वायसर , नट ,बोल्टचे येथे उत्पादन होणार यामुळेही बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने चेअरमन हनुमंत( तात्या) मडके यांनी तेरणेचा छावा शी बोलताना सांगितले उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा या गावात विविध इंडस्ट्रीजवर उत्पादन होत असल्यामुळे नवीन उद्योजकांना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
0 Comments