येरमाळा / तेरणेचा छावा:-
चोराखळी येथील डी.व्ही.पी ग्रुप यांच्या धाराशीव साखर कारखाना युनिट क्रमांक १ मध्ये सन २०२२-२3 गळीत हंगाम १०वा यांचे रोलर पुजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले..
यावेळी कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, छोटु भोसले, सुहास भैया,डि.व्ही.पी पतसंस्थेचे संचालक प्रा.सुनिल पाटील, प्रवीण बोबडे, सर्व शाखेतील मुख्य अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या सूचनेप्रमाणे कारखान्याचे संचालक सुहास कांदे यांनी हंगाम 2021-22 , उस बिलाचा दुसरा हप्ता रक्कम रुपये 150 प्रमाणे दिनांक 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खाते वर्ग करण्यात येईल असे जाहीर केले तसेच हंगाम 2022 23 साठी तोडणी वाहतूक करार पूर्ण झाले असून त्याचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला तसेच उसाची नोंदी व कारखाना देखभाल दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून कारखाना लवकरात लवकर चालू करण्याचे जाहीर करण्यात आले.
0 Comments