Subscribe Us

डॉ. संदीप तांबारे यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

येरमाळा/ तेरणेचा छावा:-
यश मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष तथा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे तसेच .जि. प. मा.सदस्य मदन बारकुल यांच्या वतीने ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शुक्रवार (दि. १२ ऑगस्ट) रोजी गणवेशाचे वाटप करण्यात आले
     डॉ.संदीप तांबारे यांनी 45 गणवेश व मदन बारकुल  यांनी 25 अशाप्रकारे पाचवीच्या एकूण 70 विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे  वाटप  वाटप केले
    यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक प्राचार्य  पौळ एस . एल तसेच पर्यवेक्षक कुंभार व्ही .जी .यांनी शाळेच्या वतीने डॉ. संदीप तांबारे व मदन बारकुल  यांचा सत्कार केला   याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
     15 ऑगस्ट स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक गरजू विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते.अशाप्रकारे .डॉ. संदीप तांबारे यांनी अनेक वेळा शैक्षणिक ,आरोग्य व इतर अनेक समस्यांसाठी गरजवंतांना वेळोवेळी मदतीचा हात देत असतात त्यामुळे  समाजात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. 
   अशाप्रकारे गणवेश वाटपासारखा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments