Subscribe Us

जिल्ह्यातील पहिल्या तिरंगा सेल्फी पॉइंटचे येरमाळा मेथिल जनहित पतसंस्थेसमोर उद्घाटन.


  
येरमाळा/ तेरणेचा छावा:- 
   येरमाळा येथील जनहित पतसंस्थेसमोर भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमीत्त व अमृतमहोत्सवा अंतर्गत घरोघरी तिरंगा  उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्या सेल्फी पॉईटचे उदघाटन अरविंद अशोकराव मशाळकर व  सुभाषराव पेजगुडे सर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी दै.लोकमतचे प्रतिनिधी सचिन बारकुल,जनहित परिवाराचे अध्यक्ष प्रा. संतोष तौर, जनहित पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नितिन (अप्पा) कवडे, व्यवस्थापक शिवप्रसाद घवारे, बंधन संस्थेचे मंगेश सातपुते  यांच्या सह सभासद व कर्मचारी यांची उपस्थीती होती.
    उस्मानाबद जिल्ह्यातील एकमेव सेल्फी पॉईंट असल्याने येथे सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंदात सहभागी होण्यासाठी सेल्फी पॉईंट उपलब्ध  करून दिल्याबद्दल नागरिकातून जनहित पतसंस्थेचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments