उस्मानाबाद / तेरणेचा छावा
उस्मानाबाद (धाराशिव )जिल्ह्यातील येरमाळा येथील युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विजय वारकुल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय नरसिंग आण्णा चा कार्यकर्ता असलेले 2007 पासून खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासोबत राजकारणात सक्रिय राहिल्यामुळे 2012 सालापासून 2019 पर्यंत त्यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याच्या उपजिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली होती..त्यांच्या काळात जिल्ह्यात युवा सेनेच्या अनेक शाखा स्थापन करून त्यांनी अनेक युवकांना युवा सेनेत घेऊन पक्षबांधणी केली होती.
बालपणापासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाच्या ८ व्या वर्षापासून गळ्यात भगवा गमजा परिधान करत होते.पुढे कॉलेज जीवनातही त्यांनी बाळासाहेबांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवत होते.बाळासाहेबांच्या कडवे विचाराचा कडवट शिवसैनिक अशी ही त्यांची परिसरात ओळख आहे. मागील काही दिवसापासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त असल्याचे दिसून येत होते.
सध्या ते शिंदे गटाच्या प्रेमात असल्याचे त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वरून ते दिसून येत आहे.
0 Comments