येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येरमाळा ग्रामपंचायत निवडणुक सन २०२१ च्या मध्ये झालेल्या १३ जागेसाठीच्या निवडणूकीमध्ये सर्व जागा भारतीय जनता पार्टी येरमाळा ग्रामविकास आघाडीच्या आल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासु युवा नेते उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.संचालक ,माजी पंचायत समिती सभापती तथा माजी सरपंच विकास बारकुल यानी ऐतीहासिक एकहाती सत्ता काबीज केली होती.
सोमवार (दि.२९ ऑगस )रोजी निवड प्रक्रीयेमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी जाहीर झाले होते.यामध्ये चार महीला असल्याने सर्वांमुमते चारही महिलेस पदभार देण्याचे ठरले अन् तब्सुम सय्यद यांना सव्वा वर्ष पुर्ण झाल्याने द्वितीय क्रमाकाच्या सौ.सुजाता श्रीकांत देशमुख यांची बिशविरोध निवड करण्यात आली.
येरमाळा ग्रामपंचायत निवड प्रक्रिया कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी मा.सभापती विकास बारकुल,भाऊसाहेब बारकुल,उपसरपंच गणेश बारकुल,,मुरहारी कांबळे,रावसाहेब बारकुल,चेअरमन रामकिसन बारकुल,मनोज बारकुल,महावीर आचलारे,सुनील जाधव,विलास बारकुल,मच्छिद्र बारकुल,विजय देशमुख,सोमनाथ बारकुल,दशरथ जाधव,तानाजी सवने,शिवराज बारकुल,महेश घेवारे, दत्ता बारकुल, रामकिसन कोकाटे,भगवान ओव्हाळ,संतोष कोळी,माजी सरपंच,माजी सदस्य,जेष्ट नागरीक,ग्रामस्त उपस्थीत होतै. निवड प्रक्रीया मंडळाधिकारी डी.एम.कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणुन तर त्याना सहकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी ऐ. वाय.आमले यांनी काम पाहिले.
या वेळी ग्रा.पं.लिपिक प्रितेश बारकुल,कोतवाल संजय पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,उपस्थित होते. निवडी नंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
0 Comments