Subscribe Us

येरमाळा येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

येरमाळा/ तेरणेचा छावा:-
  कळंब तालुक्यातील येरमाळा येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
      येथिल नाभिक संघटनेच्या वतीने श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाजाच्या प्रतिमेची पुजा गणेश मोरे यांच्या हस्ते करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप मंगळवार दि.२३ रोजी  करण्यात आले.यादरम्यान पुण्यतिथिनिमित्त ह.भ.प.विठ्ठल पवार यांचे किर्तनाचा तर कारी- नारी येथिल गंगूबाई जाधव यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला.
         यावेळी निशिकांत गायकवाड,विजय देशमुख,तानाजी सवने,दशरथ जाधव,संतोष तौर,मनोज बारकुल,सुहास बारकुल,दत्ता बारकुल,सतीश मोरे, विजय मोरे, प्रविण मोरे, हनुमंत मोरे, दिलीप मोरे, प्रभाकर पवार, अशोक मोरे, राहुल मोरे, सागर मोरे, सुरज मोरे, राहुल धाकतोडे,  प्रशांत मोरे, अश्रूबा मोरे, रणजित दळवी,दत्ता गायके, रोहित मोरे, सुरज धाकतोडे आदीसह समाज बांधव उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments