मोहा/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडस्ट्रीज या गुळ पावडर कारखान्याचा येणाऱ्या गळीत हंगामाचा रोलर पूजन कार्यक्रम सोमवार ( दि.२२) रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेट तथा मोहेकर अॅग्रो इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या)मडके, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा चे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेकर मल्टीस्टेट चे व्हा.चेअरमन डॉ ज्ञानोबा जाधव, कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेकर अॅग्रो चे संचालक बापुराव शेळके, अनंतराव मडके, रमेश मोहेकर, फुलचंद मडके, धनंजय मडके, प्रमोद मडके,बाबासाहेब मडके, किशोर सावंत,ज्ञानेश्वर मडके, नितीन माने, अशोक इके तसेच कारखान्यातील कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष भैय्या मडके यांनी केले तर आभार कारखान्याचे सी ई ओ विशाल मडके यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहेकर मल्टीस्टेट चे अधिकारी इम्रान शेख यांनी केले.
0 Comments