Subscribe Us

22,67,120 ₹ मुद्देमालासह जुगारी गळाला. सहाय्यक पोलीस अधिक्षक एम रमेश यांची धडक कारवाई


कळंब/ तेरणेचा छावा:-
    डिकसळ येथील ढोकी रस्त्यालगतच्या एका शेडमध्ये   तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सहा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना बुधवार दिनांक 6 जुलै रोजी मिळताच रात्री 08:30 च्या सुमारास  पथकासह त्यांनी  छापा टाकला असता कळंब येथील सम्राट गायकवाड, हुजेब बागवान, रियाज अत्तार, मनसुर बागवान, रहुदास हगारे, रोहन कांबळे, गंगाराम पवार, राहील शेख, सत्तार शेख, उमरान मिर्झा, शरद ढीवार, अमोल राउत, संजित मस्के, ओमकार कसबे हे सर्व तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 8 भ्रमणध्वनी, 4 मोटारसायकल, 4 चारचाकी वाहने व रोख रक्कम असा एकुण 22,67,120 ₹ चा माल बाळगलेले पथकास आढळले.त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून कळंब पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली.
   उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश यांना अवैद्य धंदेविषयी कुणकुण लागतात धडक  कारवाई करत असल्यामुळे अवैध धंदे चालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments