Subscribe Us

आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांच्या मंत्रिपदासाठी समर्थकांनी धारासूरमर्दिनी देवीला महाआरती करुन घातले साकडे

     उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
माजी राज्यमंत्री तथा परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी याकरिता आमदार सावंत समर्थकांच्या वतीने गुरुवार (दि.7 जुलै) रोजी धारासूरमर्दिनी देवीची महाआरती करुन साकडे घातले. माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या  पुढाकारातून हा महाआरती सोहळा धारासूरमर्दिनी मंदिरात पार पडला.
    महाराष्ट्र राज्यात नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्यात आलेले आहे. नव्या मंत्रिमंडळाची लवकरच निवड होणार आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्याला नेतृत्वाची संधी मिळावी अशी शिंदे समर्थक शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यासाठीच जिल्ह्यातील परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात धारासूरमर्दिनी देवीची महाआरती करुन मंत्रिमंडळात आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांना संधी मिळू दे, असे साकडे देवीला घालण्यात आले. यावेळी समर्थकांनी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करत आमदार सावंत यांना मंत्रिपदी संधी मिळावी अशा आशयाच्या घोषणा दिल्या. 
सावंत यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्याचा विकास होईल - सुरज साळुंके
     धाराशिव हा मागासलेला जिल्हा आहे. देशातील मागासलेल्या जिल्ह्यात धाराशिव तिसर्‍या क्रमांकावर आहे. ही ओळख पुसण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे होणे अपेक्षित आहे. आमदार तानाजीराव सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाल्यास येथील औद्योगिक विकास, मेडिकल कॉलेज, रेल्वे यांसारखे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार तानाजीराव सावंत यांना मंत्रीपद मिळावे याकरिता आई तुळजाभवानी व धारासूरमर्दिनी देवीला आम्ही साकडे घातल्याचे माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी सांगितले.
     यावेळी योगेश तुपे, प्रणील रणखांब, विलास लोकरे, सागर कदम,  गगन आगलावे, आकाश माळी, अविनाश टापरे, दिनेश तुपे, लखन झिरमिरे, विशाल हिंगमिरे, मयुर आडसुळ, नितीन देवकते, महेश मगर, अतुल टापरे, सागर कदम, बबलू वंडरे, बबलू नवले, राकेश ठवरे, नागेश थोरबोले, कुणाल धोत्रीकर, ललन पाटील  सुनिल काळे, आदित्य गवंडी, नागेश वर्‍हाडे, गणेश चौधरी, ओंकार मैराण, गणेश जाधव, अंकुश मुळे, सचिन मडके, सुरज राऊत रंजित चौधरी अतुल,महेश देवकाते, सचिन मडके, अक्षय देवकते, आकाश शेडगे निखिल माने, दिनेश जाधव, आण्णा मगर, अमोल गायकवाड संकेत हाजगुडे यांच्यासह शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments