Subscribe Us

श्रुती माशाळकर यांची चेअरमन तर व्हॉइस चेअरमन नितीन कवडे यांची बिनविरोध निवड .


येरमाळा/तेरणेचा छावा:-
  ..येरमाळा परिसरात व तालुक्यात अल्पावधीतच लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या  
 जनहित पतसंस्थेच्या बुधवार  (दि. 29 जून) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा बिनविरोध निवडीचा कार्यक्रम पार पडला. 
      निवडूणूक अधिकारी म्हणुन श्री.बी.ए.शिंदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळब यांच्या अध्यक्षेतेखाली  निवड पार पडली.यावेळी सर्व संचालक मंडळीची उपस्थीती होती. 
   यावेळी चेअरमनपदी सौ.श्रुतीताई वल्लभ माशाळकर यांची तर व्हा.चेअरमन म्हणुन नितिन कल्याणराव कवडे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली, याप्रसंगी  नुतन संचालक नवले बळीराम, तौर बाबासाहेब, कोकाटे रामकीसन,रणसिंग दत्तात्रय, भगत अंकुश, शिंदे सुनिल,सौ.मनिषा गणेश मोरे, जाधवर संगिता शिवाजी, उगडे स्वाती गोवर्धण,घेवारे प्रिया शिवप्रसाद उपस्थीत होते, नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक यांचा सत्कार जनहित पतसंस्थेचे संस्थापक प्रा.संतोष तौर, वल्लभ मशाळकर,गणेश मोरे, संतोष आगलावे, यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी समाधान भगत, रमेश बारकुल, अभिजित कुलकर्णी, अभिजित पाटील, शिवाजी जाधवर,पवण ओव्हाळ, निशांत कांबळे,संदेश वाधमारे जिवण जाधव सभासद खातेदार कर्मचारी उपस्थीत होते, अभार संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी मांडले.
    जनहित पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व संचालक मंडळांनी  एकत्र येत संस्थेच्या हितासाठी बिनविरोध निवडीसाठी आग्रह धरून खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड करून संस्थेत सर्व खेळीमेळीचे वातावरण चालू असल्याचे दाखवून दिले. काही हजार रुपयात भागभांडवलात  स्थापन झालेल्या या पतसंस्थेत सध्या कोट्यावधीची उलाढाल होत आहे. सर्व सभासद संचालक मंडळ यांचा एकोपा जपत  पतसंस्था नावारूपाला आली आहे.सध्या पतसंस्थेच्या येरमाळा व कळंब येथे शाखा आहेत 
      श्रुतीताई माशाळकर यांची  चेअरमन तर व्हॉइस चेअरमन नितीन कवडे  यांची  बिनविरोध निवड झाल्याने येरमाळा व  परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments