Subscribe Us

हे आहेत उस्मानाबादचे पालकमंत्री?


 उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
    मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे निवड यांची निवड झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात जास्त कशाची चर्चा कशाची आहे तर  उस्मानाबादचे पालकमंत्री कोण होणार याची?
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला भरभरून स्थान मिळणार असे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे कारण भाजपच्या कोट्यातून आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना बंडखोर गटातून तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले यांना स्थान मिळणार असल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला  मंत्रिमंडळात स्थान नव्हते.परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला भरभरून दिले जाईल अशी जनतेतून चर्चा सुरू आहे.
    यात तुळजापूर मतदारसंघाचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील ,भूम परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत , लोहारा उमरगा चे .आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नावाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
यातून कोणाला कोणते मंत्री पद मिळणार व कोणाला पालकमंत्री पद मिळणार तर कोणाला महामंडळ मिळणार याची चवीने चर्चा सुरू आहे. कार्यकर्ते आपल्याच नेत्याची मंत्रीपदी व पालकमंत्री पदी नियुक्ती होणार असे आत्मविश्वासाने सांगत असले तरीही      
       शेवटी एकनाथ शिंदे यांची जशी अनपेक्षित पणे मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली  तशी सुदधा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून  ज्ञानराज चौगुले यांनाही लॉटरी लागू शकते अशी एक चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments