Subscribe Us

दहिफळ परिसरात दमदार पाऊस शेतकरी आनंदी


ब-याच विश्रांती नंतर दमदार पाऊस.पहिल्याच पावासात ओढ्याला आला पूर.
दहिफळ/तेरणेचा छावा:-
      कळंब तालुक्यातील दहिफळ येथे दि २६ जुन रोजी ५ घ्या सुमारास दमदार पाऊस झाला.या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
    सविस्तर माहिती अशी की,पावसाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी म्हणावा असा पाऊस पडला नव्हता.शेतक-यांनी शेतातील सर्व पेरणीपूर्व मशागत करून घेतली आहे.बि बायाणे खत खरेदी केलेले आहे.परंतु पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता.
   
      पावसाच्या प्रतिक्षेत असणा-या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.दि.२६ जुन रोजी अचानक दमदार पाऊस पडल्यामुळे गावालगत परतापूर दहिफळ रस्त्यावर असणा-या ओढ्याला पूर आला होता.यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे या मार्गे जाणारी कळंब उस्मानाबाद बस एका जागेवर उभा होती तसेच शेतातून येणारे शेतकरी व प्रवासी यांची चांगलीच कोंडी झाली होती.गावात यायचे म्हटले तर दुसरा मार्ग नाही.प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या ओढ्याला पूर येतो.पूलाची उंची वाढवीणे गरजेचे आहे.वाहतुक सुरळीत होण्यासाठी कमाणी पूल व्हावा अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाश्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments