Subscribe Us

येरमाळा येथे अग्निपंख भेट देत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

येरमाळा/ तेरणेचा छावा:-
   येथिल वाय.सी.सी.मित्रमंडळ व जनहित परीवार यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 25 जून रोजी पाटील वाडा गुरव गल्ली येरमळा येथे  आयोजित करण्यात आला होता.
     यावेळी येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या हस्ते अग्नीपंख पुस्तक शाल श्रीफळ.बुके, देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमोल पाटिल तर प्रमुख पाहूणे म्हणुन जनहित परिवाराचे अध्यक्ष प्रा संतोष तौर यांची उपस्थिती होती, तसेच एस.बी.आयचे अमित ओव्हाळ,दिपक ताटे, गणराज देशमुख , राहुल पाटिल, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, संदिप पेजगुडे , वल्लभ माशाळकर पत्रकार सुधिर लोमटे,यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद पांगरकर यांनी  केले, तर अभार संतोष आगलावे  यांनी मानले.    
     यावेळी सुर्यकांत बेदरे,भरत बारकुल,हर्षल बारसकर, विद्यार्थी, पालक, गावकरी, शिक्षणप्रेमी, वाय.सी.सी. मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थीत होते.
     कार्यक्रमात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील अग्निपंख या पुस्तकाचे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेट दिल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण होते . अशा प्रकारचे सत्कार सोहळे होणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांतून चर्चा होती त्यामुळे या कार्यक्रमाचे गावकरी व परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments