Subscribe Us

बालाजी नायकल यांना महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
       सांजा ता उस्मानाबाद येथील रहिवाशी  बालाजी नायकल यांना ज्ञान किरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवार (दि. ११ मे ) रोजी इस्के फंक्शन हॉल नळदुर्ग येथे महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . 
    बालाजी नायकल यांनी आजपर्यंत  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे त्या कामाची दखल  ज्ञान किरण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला 
     पुरस्काराचे वितरण माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव चव्‍हाण, सोलापूरच्या माजी महापौर व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नसीमा पठाण, उपविभागीय पोलिस डॉक्टर सई गोरे पाटील, जि प सदस्य प्रकाश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, व संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांच्या हस्ते  करण्यात आले.
    बालाजी नायकल यांना महाराष्ट्र समाज भूषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  मित्रपरिवार व नागरिकातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments