Subscribe Us

सुधाकर रितापुरे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.


 उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
         सुधाकर रितापुरे लिखित सामना आयुष्याचा ,जीवन फुलवणारी  फुलराणी ,ग म बापाचा सदा शेतात जिरतो या तीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 13 मे रोजी उस्मानाबाद शहरातील पुष्पक पार्क येथे पार पडला.
     यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटीलतर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज  ,भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर ,धाराशिव साखर कारखान्याचे  संचालक अमर पाटील बीड जिल्हा परिषद मा.सदस्य सुरेश पाटील.प्रसिद्ध उद्योजक गणेश फाटक ,साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांची मंचावर उपस्थिती होती.
   यावेळी मान्यवरांनी पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा देऊन सुधाकर रितापुरे यांच्या विवाहाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक आप्तस्वकीय ,मित्रमंडळी यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष लगाडी व आभार प्रा आय एस.रितापुरे  यांनी केले .

Post a Comment

0 Comments