उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
स्वराज्याचे धाकले धनी ,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या 365 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील सर्व शासकीय कार्यालय मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती वाटपाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 14 मे रोजी शहरातील नगरपालिका जवळील लहुजी वस्ताद साळवे चौकात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार असून यावेळी शहरातील सर्व शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे वाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे
कार्यक्रमाचे आयोजन आपली माणसं सामाजिक बहुउद्देशीय संस्था व धारासूर मर्दिनी बहुउद्देशीय कला मंचच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बबलू राऊत व सतीश लोंढे यांनी केले आहे
0 Comments