Subscribe Us

NEET/JEE परीक्षेत स्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण व दुष्काळी भागातील विद्यार्थी होत आहेत यशस्वी. श्री सुधीर (अण्णा) पाटील



उस्मानाबाद/ सेरणेचा छावा:
         महत्त्वाच्या NEET / JEE देशपातळीवरील प्रतिष्ठेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पालकांचा सत्कार सोहळा श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीत पार पडला त्यावेळी माननीय श्री सुधीर अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले
 शिक्षण महर्षी गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांनी उदात्त हेतूने उस्मानाबाद सारख्या आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अति मागासलेल्या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. वास्तविक त्यांना इतरत्र संस्था काढणे कठीण नव्हते असे श्री सुधीर पाटील यांनी सांगितले परंतु गेली दहा ते पंधरा वर्षे आम्ही भगीरथ प्रयत्न करीत आहोत त्याचे यश आता मिळत आहे गेल्या वर्षी पाच ते सहा विद्यार्थी नीट व जेईई परीक्षेत यशस्वी झाले
 यावर्षी 20  विद्यार्थी NEET  व JEE परीक्षेत यश  मिळू शकले हे यश आपोआपच मिळाले नसून त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले आहेत देशातील नामांकित संस्था आकाश  ॲलन मोदी इन्स्टिट्यूट या ठिकाणी भेटीगाठी देऊन तेथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांना आमंत्रित केले एवढेच नाही तर  त्यांना  अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे येथील सर्वसामान्य विद्यार्थी पालक यांची लातूर पुणे मुंबई येथील शिक्षणाची होणारी परखड थांबू शकली
Photon Batch ( फोटोन ) हा  क्लास गुणवंत व होतकरू मुलांसाठी निर्माण केला या वर्गाचे क्लास सकाळी 7:30  ते 4:00 पर्यंत चालत व सायंकाळी 6:00  ते 9:00 रात्र अभ्यासिका सुरू केली तसेच विद्यार्थ्यांसाठी  डाऊट सेशन चे वर्ग सुरू केले  केवळ 12 नव्हे तर पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांच्या साठी फाउंडेशन कोर्स याच महिन्यात एप्रिल 2022 मध्ये तज्ञ अनुभवी व प्रतिभावंत संस्थेतील शिक्षकांची नेमणूक करून तसेच आधुनिक सुविधा पुरवून सुरू करणार असल्याचे सांगितले
 श्री उंबरे अमर युवराज (एम बी बी एस आंबेजोगाई)
 कु कुंभार अंकिता बालाजी ( एम बी बी एस लातूर)
 क यादव प्रतिभा सुनील ( एम बी बी एस नगर),
 कु  घारगे दिशा संतोष ( बी डी एस कराड)
 कु लोमटे प्रतीक्षा पद्माकर ( बी ए एम एस नांदेड)
 कुर निर्मळे पोर्णिमा राजकुमार ( बी ए एम एस  शेवगाव नगर) 
श्री काकडे आदित्य प्रशांत (बी ए एम एस सांगली)
 क सातपुते श्रावणी गोपाळकृष्ण (बी ए एम एस इस्लामपूर)
 कु सदाफुले मधुमती शरद (जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई)
 श्री उंबरे तुषार सोमनाथ (डी वाय  पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डी पुणे)
 या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी कुमारी यादव प्रतिभा हिने आपले मनोगत व्यक्त  करताना महाविद्यालयात केलेल्या विविध  उपक्रमाचे कौतुक केले तसेच आभार मानले विद्यार्थी तसेच पालक यांचे अभिनंदन संस्थेमार्फत केले
 या सत्कार प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य भय्या पाटील प्राचार्य श्री देशमुख एस एस उपप्राचार्य श्री  घारगे एस के फोटोन विभाग प्रमुख श्री भगत ए व्ही श्री पुजारी डी व्ही श्री शिंदे एम एन श्री सदाफुले एस एस ,पत्रकार याशिवाय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री स्वप्नील पाटील ऋषी शिंदे  याशिवाय श्री काळे श्री घोडके श्री तांबोळी यांनी परिश्रम घेतले
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला वाणिज्य विभाग प्रमुख श्री नन्नवरे  एन आर यांनी केले तर आभार श्री भगत  सर यांनी मानले .

Post a Comment

0 Comments