उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
एकीकडे एकाच वेळी चार आंदोलने तर दुसरीकडे
उन्हाचा वाढता पारा व उकाड्यामुळे होणारी अंगाची काहिली काहिली
सोमवार दि. ४ एप्रिल २०२२ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक नव्हे तर चक्क चार आंदोलने... त्याचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकारही उन्हात तळपले. इंधनाच्या वाढत्या किंमती कमी करण्यास केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले भाजप सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे महागाई वाढली असून या महागाईचे चटके सर्वांनाच बसू लागले आहेत. या महागाईच्या निषेधार्थ अर्थात महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. तर त्याला विरोध म्हणून भाजपनेही महागाई व राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तसेच याच परिसरात जिल्ह्यातील साखर कारखाने सभासद असलेल्या व नसलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी नेण्यास टाळाटाळ करीत आहेत. ते कारखानदार जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी नेण्याऐवजी पर जिल्ह्यातून ऊस आणून गाळप मोठ्या थाटात सुरू आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी बळीराजा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. हे कमी होते की काय ? तर त्यात आणखी एका आंदोलनाची भर पडली. ती म्हणजे जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात प्रशासनाचा कणा म्हणून समजल्या जाणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत आंदोलन सुरू केले. एकाच वेळी सर्व वर्तांकन करण्याची व ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी पत्रकारांवर येऊन पडली. त्यातच उन्हाचा वाढता पारा व उकाड्यामुळे अंगाची होणाऱ्या काहिली काहिलीने त्रस्त झालेल्या पत्रकारापैकी काही पत्रकारांनी काँग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर त्या रिकाम्या मंडपात असलेल्या सावलीचा आधार घेत द्राक्षाचा आस्वाद घेतला. यावेळी पत्रकार दीपक जाधव, राहुल कोरे, सुधीर पवार, पांडुरंग मते व मल्लिकार्जुन सोनवणे आदी दिसत आहेत.
0 Comments