गौर/ तेरणेचा छावा:-
पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व विवेक फाउंडेशन यांच्याकडून पेंटिग क्षेत्रात नावलौकिक मिळवल्याबद्दल महिला दिनानिमित्त वर्षा कांबळे यांना जनाई -मुक्ताई पुरस्कार मोठ्या कार्यक्रमात 27 मार्च रोजी प्रदान करणात आला.
वर्षा कांबळे यांना महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कळंब येथिल राष्टीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते श्रीकांत कळंबकर, निखिल भडंगे , विजय घोळवे, शिवाजी पचमीरे, रावसाहेब गंभीरे यांनी रविवार (दि.3 एप्रिल रोजी )गौर तालुका कळंब येथे घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी मारुती देशमुख सर पिंटू माळी, विजय कांबळे काशिनाथ कांबळे उपस्थित होते.
गौर सारख्या ग्रामीण भागातील वर्षा कांबळे यांना महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments