गौर/तेरणेचा छावा:-
गौर तालुका कळंब येथे बुधवार दिनांक23 मार्च सप्ताह सुरुवात झाली व बुधवार दिनांक 30 मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली .
सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ,गाथा भजन ,दुपारी भावार्थ रामायणातील ब्रह्मपत्र वाचन ,हरिपाठ रात्री 9 ते11 हरिकीर्तन सेवा पार पडली.या सप्ताहात ॲडव्होकेट ह भ प पांडुरंग महाराज लोमटे ह भ प ऋषिकेश महाराज वासकर ,योगेश महाराज इंगळे ,ह भ प प्रकाश महाराज बोधले ,ह भ प एकनाथ महाराज लोमटे,ह भ प माधव महाराज बोधले ,काल्याच्या कीर्तनाची सेवा ह भ प गुरुवर्य नारायण महाराज बोधले यांची झाली.सप्ताहाच्या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
0 Comments